शबनम न्यूज | प्रतिनिधी
दरवर्षी पुणे फेस्टिव्हलमध्ये कीर्तन महोत्सव आयोजित केला जातो. यंदाचे याचे सहावे वर्ष आहे. यंदा महाराष्ट्राची नारदीय कीर्तन परंपरा समर्थपणे पुढे नेणारे ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे यांचा विशेष सन्मान बुधवार दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, शाल व श्रीफळ असे सन्मानाचे स्वरूप आहे.
याप्रसंगी श्री हरि कीर्तनोत्तेजक सभेचे विश्वस्त कीर्तन कलानिधी, कीर्तन केसरी ह. भ. प. रामचंद्र प्रभाकर भिडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते सत्कार संपन्न होईल. या कार्यक्रमात प्रारंभी युवा कीर्तनकार सौ. तन्मयी मेहेंदळे कुलकर्णी ‘नांदी’ सादर करणार असून ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. निवेदिता मेहेंदळे ‘श्री. गणेश उपासना’ कीर्तन सादर करतील.




Total Users : 225960