spot_img
spot_img
spot_img

CRIME : काळेवाडी पोलिस ठाण्यासमोर मध्यरात्री भररस्त्यात राडा!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मध्यरात्री सार्वजनिक रस्त्यावर एकमेकांना शिवीगाळ करत चक्क मारामारी आणि आरडाओरड करणाऱ्या पाच जणांवर काळेवाडी पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर झालेल्या या राड्यामुळे काही काळ परिसरातील शांतता भंग झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी पोलिस ठाण्यासमोरील सार्वजनिक रस्त्यावर मध्यरात्री पाच जणांमध्ये वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि मारामारीत झाले. आरोपींनी एकमेकांना मारहाण करत मोठमोठ्याने आरडाओरड केली. त्यामुळे रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रकारामुळे सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिस हवालदार रणधीर माणिकराव भोसले यांनी फिर्याद दिली.

फिर्यादीवरून राजू आल्हाट, लक्ष्मण आल्हाट, योगेश मंडलिक, दिनेश वळू आणि पंकज आल्हाट या पाच जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून शांतता भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे वाद घालून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!