spot_img
spot_img
spot_img

वृंदावनच्या ‘प्रेम मंदिरा’च्या भव्य प्रतिकृती ची विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद

पुणे : वृंदावन येथील प्रसिद्ध शुभ्र संगमरवरी ‘प्रेम मंदिरा’ची १०० फूट उंच भव्य प्रतिकृती पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या १३४व्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरली आहे.

मूळ प्रेम मंदिराची सुंदर वास्तुरचना साकारलेली ही प्रतिकृती भाविक आणि पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या भव्य प्रतिकृतीचे १४ सप्टेंबर २०२६ रोजी विधिवत उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. गणेशोत्सवाच्या उत्साहात या देखण्या मंदिरामुळे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात भर पडली आहे.
वृंदावनच्या ‘प्रेम मंदिरा’च्या भव्य प्रतिकृती ची विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद करण्यात आली आहे. विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या चेअरमन मिस इंडिया डॅा ईशा अगरवाल यांनी नोंदीची अधिकृत घोषणा केली व विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र मंडळाचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, व सरचिटणीस आमदार हेमंत रासने यांना केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,
विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या चेअरमन मिस इंडिया डॅा ईशा अगरवाल व विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’चे संस्थापक-अध्यक्ष आणि ‘प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालया’चे ध्यान प्रशिक्षक १८४ वर्ल्ड रेकॉर्ड करणारे पहिले भारतीय ब्रह्माकुमार डॉ. दीपक हरके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!