spot_img
spot_img
spot_img

पुणे ऑन पेडल्स’ सायकल रॅलीचे उद्या रविवारी (ता. १३) आयोजन

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ‘पुणे ऑन पेडल्स’ सायकल रॅली, तसेच ‘पुणे फॅमिली वॉकेथॉन’चे आयोजन केले आहे. उद्या रविवारी (ता. १३) सकाळी ६ वाजता मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिर येथून रॅलीला सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असणार आहे.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “पुणे हे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जाते. सायकल वापरणे आरोग्यासाठी लाभदायक असून, सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम गेल्या सहा वर्षांपासून आयोजित केला जात आहे. ही रॅली केवळ सायकल चालविण्याचा कार्यक्रम नसून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यजागृतीचा संदेश देणारा उपक्रम आहे. या सायकल रॅलीच्या निमित्ताने गरीब गरजू विद्यार्थ्यांना १५० सायकलींचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. तसेच रॅलीत सहभागी प्रत्येकाला पदक, प्रमाणपत्र आणि टी-शर्ट देऊन गौरविण्यात येणार आहे.”

सायकल रॅलीसाठी स्वतःची सायकल आणणे आवश्यक आहे, सर्व सायकलस्वारांनी हेल्मेट वापरणे अनिवार्य आहे. सायकल रॅलीदरम्यान वाहतुकीचे सर्व नियम आणि आयोजक/वाहतूक व्यवस्थापनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. स्वतःची पाण्याची बाटली सोबत आणावी, टोपी, सायकलस्वारांनी हेल्मेट व इतर आवश्यक साहित्य सोबत ठेवावे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!