spot_img
spot_img
spot_img

मावळ तालुक्यातील अस्थिव्यंग दिव्यांगां लाभार्थ्यांना कृत्रिम हातपाय व कॅलिपर चे वाटप..

तळेगाव दाभाडे :- दिनांक ०८ सप्टेंबर २०२६ रोजी भाऊसाहेब देसाई जनरल हॉस्पिटल येथील मेमोरियल ऑडिटोरियम हॉल मध्ये एस. आर. ट्रस्ट रतलाम मध्यप्रदेश व ALIMCO रतलाम मध्यप्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील अस्तीव्यंग दिव्यांग गरजू लाभार्थ्यांना (ऑन द स्पॉट) कॅलिपर व कृत्रिम हात व पाय मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवर मावळ तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री. सेवक थोरात.. वैद्यकीय अधिक्षक डॉ. दर्पण महेश गौरी ..ALIMCO मुंबई डॉक्टर किरण पावरे.. एस. आर. ट्रस्टचे शाहरुख शहा राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल महिला अध्यक्षा सौ. ज्योती राजीवडे वडगाव नगरीचे नगरसेवक श्री. अजय भवार राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल तालुकाध्यक्ष श्री. सुभाष शेडगे ..सामाजिक कार्यकर्ते श्री. भरत नाना राजीवडे.. श्री सोमनाथ पटेकर.. श्री.सोमनाथ मोरे.. अंगणवाडी सुपर वायझर श्रीमती जुलै खा शेख मेडिकल सोशल वर्कर सौ. आश्विनी वनारसे ..रेखा बरीदे ..छाया साळुंखे …सुरैयाॅ शेख.. हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

आलेल्या प्रमुख मान्यवरांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. एस. आर. ट्रस्टचे मा.श्री. शाहरुख शहा यांनी आपल्या मनोगत कृत्रिम हात व पाय कसे वापरायचे त्याबद्दलची थोडक्यात माहिती सांगून कॅलिपर कसे वापरायचे याची मुलांना व सर्व लाभार्थ्यांना माहिती दिली.
तसेच मावळचे गटविकास अधिकारी माननीय श्री. सेवक थोरात यांनी आपले मनोगत दिव्यांगांसाठी जेवढ्या काही शासकीय योजना उपलब्ध आहेत त्यांचा सर्वांनी पुरेपूर लाभ घ्यावा असे सर्वांना आवाहन केले.आज मावळ तालुक्यातील जवळपास ४५ लाभार्थ्यांना (ऑन द स्पॉट) कृत्रिम पाय व कॅलिपर चे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी साजन येवले.. संदीप लोखरे ..संपत लांडगे… गणेश शेडगे.. तसेच एस. इ. सी. सेंटर नायगाव येथील शाळेतील २५ विद्यार्थी व तसेच मावळ तालुक्यातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री भरत नाना राजीवडे यांच्याकडून शाळेतील मुलांना अल्पउपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!