spot_img
spot_img
spot_img

आधुनिक साहित्याच्या दृष्टिकोनातून कृष्णचरित्राचा उलगडा

एमआयटी स्कूल ऑफ ड्रामामध्ये ‘हिंदोत्सव २०२६’ अंतर्गत साहित्यिक चर्चा व नाट्यप्रस्तुती

पुणे : महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, सहज कलात्मक फाउंडेशन आणि एमआयटी स्कूल ऑफ ड्रामा, एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी (एडीटी) विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदोत्सव २०२६’ अंतर्गत ‘आधुनिक साहित्यात कृष्ण’ या विषयावर साहित्यिक चर्चा आणि नाट्यप्रस्तुतीचे आयोजन करण्यात आले.
विद्यापीठातील राज कपूर सभागृहामध्ये हा कार्यक्रम झाला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाला सहज कलात्मक फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण शेखर, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे सहसंचालक सचिन निंबाळकर, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डाॅ.नचिकेत ठाकूर आणि एमआयटी स्कूल ऑफ ड्रामाचे विभागप्रमुख डॉ. अमोल देशमुख यांच्यासह साहित्य, कला आणि रंगभूमी क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमात ‘आधुनिक साहित्यात कृष्ण’ या विषयावर डॉ. सुनील देवधर आणि समीक्षा तेलंग यांनी विचार मांडले. आधुनिक साहित्यामध्ये भगवान कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, त्यांची समकालीन संदर्भातील उपयुक्तता तसेच साहित्यिक अभिव्यक्ती यावर चर्चा करण्यात आली. यानंतर अरुण शेखर लिखीत व एन.के.पंत यांचे दिग्दर्शन आणि मिलिंद त्रिवेदी यांनी संगित दिलेल्या ‘सुनो कन्हैया’ या नाट्यप्रस्तुतीचे सादरीकरण करण्यात आले.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमातून हिंदी साहित्य, रंगभूमी आणि भारतीय सांस्कृतिक परंपरेतील कृष्णविचार यांचा समकालीन दृष्टिकोनातून वेध घेण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला होता.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!