शबनम न्यूज | प्रतिनिधी
सावरगाव, ता. भूम येथील कै. महेंद्र बोराडे यांच्या अपघाती निधनामुळे बोराडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या कठीण प्रसंगी आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी बोराडे कुटुंबाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.
आमदार सावंत यांनी स्वतःच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे बोराडे कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे पालकत्व स्वीकारत तातडीने रोख आर्थिक मदत सुपूर्द केली.
यासोबतच, दोन्ही मुलांच्या शिक्षणाची तसेच भविष्यातील रोजगाराची जबाबदारीही आपण स्वीकारत असल्याचे आमदार तानाजीराव सावंत यांनी सांगितले.
दुःखाच्या प्रसंगी केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे केल्याने बोराडे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
संकटात धावून येणारा ‘बापमाणूस’ म्हणून आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांची ही भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे.










Total Users : 220869