पिंपरी | प्रतिनिधी : युनूस खतीब
ई-चलानची फाईल व्हॉट्सॲपवर पाठवून मोबाईलचा अॅक्सेस मिळवत अज्ञात सायबर भामट्याने व्यावसायिकाच्या बँक खात्यातून तब्बल ६ लाख ८८ हजार ९६० रुपये परस्पर ट्रान्सफर केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार २ सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते सायंकाळी ५.१८ वाजण्याच्या दरम्यान घडला.
याप्रकरणी इंदल नथुनी चौहान (वय ४४, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ई-चलान फाईल पाठविणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध बीएनएस कलम ३१८(४) व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने व्हॉट्सॲपवर ई-चलानची फाईल पाठवून फिर्यादीच्या मोबाईलचा अॅक्सेस घेतला आणि त्यांच्या आयडीबीआय बँक खात्यातून ६,८८,०००.९६ रुपये परस्पर ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपी अद्याप अज्ञात असून अटक झालेली नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक भोजराज करीत आहेत.










Total Users : 219894