तळवडे | प्रतिनिधी : युनूस खतीब
कोणतीही वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती शेअर न करता महिलेच्या बँक खात्यातून तब्बल ५ लाख ९४ हजार ९९५ रुपये परस्पर वजा झाल्याची धक्कादायक घटना तळवडे येथे घडली.
याप्रकरणी प्रियंका विठ्ठल वाघाडे (वय ३३, रा. राही हाइट्स, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरुद्ध बीएनएस कलम ३१४(४), ३१६ तसेच आयटी ॲक्ट कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३ सप्टेंबर रोजी सायंकाळी आठच्या सुमारास फिर्यादीच्या एचडीएफसी बँक खात्यातून पैसे वजा झाल्याचे सलग तीन एसएमएस आले. त्यानंतर मोबाईलवर डेबिटचा संदेश मिळाल्यानंतर खात्यातून ५,९४,९९५.६२ रुपये लंपास झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक फडतरे करीत आहेत.










Total Users : 219894