शेलू | प्रतिनिधी : युनूस खतीब
हात पकडल्याच्या आरोपावरून झालेल्या वादातून दोघांनी घरासमोर येऊन मायलेकाला शिवीगाळ व मारहाण केल्याची, तसेच दुचाकी व घरातील साहित्याला आग लावल्याची घटना शेलू (ता. खेड) येथे घडली.
याप्रकरणी संदिप सोपान कडाळे (वय ३५, रा. शेलू, टाक्याची ठाकरवाडी) यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मंगल पवार व सुदर्शन घोडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या आईला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीला आग लावली. तसेच घरात घुसून कपडे, धान्य व इतर संसारोपयोगी साहित्य पेटवून दिल्याने सुमारे २९ हजार रुपयांचे नुकसान झाले.










Total Users : 219894