spot_img
spot_img
spot_img

बुलेटला अज्ञात ॲक्टिव्हाची जोरदार धडक; तरुणाचा पाय फ्रॅक्चर

निगडी | प्रतिनिधी : युनूस खतीब 

कामावर जात असलेल्या तरुणाच्या बुलेटला अज्ञात लाल रंगाच्या होंडा ॲक्टिव्हाने जोरदार धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना यमुनानगर, निगडी येथे घडली.

३ सप्टेंबर रोजी सकाळी ८.५० वाजण्याच्या सुमारास सद्गुरू गार्डनसमोर हा अपघात झाला. दादासाहेब रामचंद्र साळुंके (वय ५३, रा. यमुनानगर, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादींचा मुलगा केतन साळुंके (वय २१) हा बुलेटवरून कामावर जात असताना अज्ञात ॲक्टिव्हाचालकाने बेदरकारपणे वाहन चालवून बुलेटला समोरून डाव्या बाजूने जोरदार धडक दिली. यात केतनच्या डाव्या पायाच्या पंजाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. अपघातानंतर ॲक्टिव्हाचालक घटनास्थळावरून पसार झाला.

अज्ञात चालकाविरुद्ध निगडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस फौजदार पराळे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!