चऱ्होली | प्रतिनिधी : युनूस खतीब
चऱ्होली बुद्रुक येथील पिरबाबा दर्ग्याजवळ पहाटेच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करून ६ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थासह दोघांना ताब्यात घेतले.
दिघी पोलिसांनी ४ सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजता धानोरी रोड परिसरात ही कारवाई केली. याप्रकरणी अंकित अर्जुन थोरात (वय २५, रा. चांडोली बु., मंचर) आणि शुभम बाळकृष्ण उमाळे (वय २७, रा. राजीव गांधीनगर, खडकी) यांच्याविरुद्ध एनडीपीएस ॲक्ट कलम ८(क), २२(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपींकडून ६ ग्रॅम एमडी, तीन मोबाईल फोन आणि एक ॲक्टिव्हा मोटारसायकल, असा सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.










Total Users : 219915