चऱ्होली | प्रतिनिधी : युनूस खतीब
सोसायटीमध्ये पाळलेले कुत्रे मोकाट सोडल्याने त्यांनी दोन ज्येष्ठ नागरिकांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना चऱ्होलीतील जेनेसिस सोसायटी, वडमुखवाडी येथे घडली.
याप्रकरणी प्रकाश केशव पवार (वय ७०) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कुत्र्यांचा मालक विक्रम रामस्वरूप बक्षी (वय ५८) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम २९१, १२५, १२५(ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपीने कुत्र्यांची योग्य काळजी न घेता त्यांना सोसायटीत मोकळे सोडल्याचा आरोप आहे. या कुत्र्यांनी फिर्यादी प्रकाश पवार तसेच नसिब नारायण ठाकूर (वय ६७) यांना चावा घेऊन जखमी केले. कुत्र्यांमुळे रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याची पूर्वकल्पना असूनही निष्काळजीपणा केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
आरोपी अद्याप अटक झालेला नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कटपाळे करीत आहेत.




Total Users : 226250