ताथवडे | प्रतिनिधी : युनूस खतीब
विक्रीसाठी मेफेड्रॉन (एमडी) बाळगणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी ताथवडे येथे अटक केली. आरोपींकडून ९ ग्रॅम एमडीसह ४ लाख ६२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
४ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास निटॉन आरएमसी प्लांटजवळ, बापुजी बुवा नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी ताबान झायार पठाण (वय ३०) आणि काशीफ परवेज मुजावर (वय २१) यांच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपींकडून ९ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी), दोन मोबाईल, एक चारचाकी कार आणि रोकड, असा एकूण ४,६२,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माळ करीत आहेत.




Total Users : 226250