पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
मुळशी | प्रतिनिधी : शेतातून जाणाऱ्या पाऊलवाटेवरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्यावर कोयत्याने डोक्यावर व हातावर सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना पिरंगुट येथील न्यू फेमस हेअर ड्रेसर्स परिसरात ४ सप्टेंबर रोजी सकाळी घडली.
याप्रकरणी रामभाऊ दामु मालपोटे (वय ३७, रा. कातरखडक, भैरवनाथवाडी, ता. मुळशी) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन खंडू मालपोटे (वय ३९, रा. आनंदनगर, भुकूम) याच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाण, धमकी व शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या वस्तीकडे जाणारी पाऊलवाट आरोपीने अडवल्याने तक्रार करण्यात आली होती. त्याचा राग मनात धरून आरोपीने कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपी अद्याप अटक झालेला नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरासे करीत आहेत.




Total Users : 226254