spot_img
spot_img
spot_img

यशस्वी विद्यालयात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी दहीहंडी उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यालयाच्या वतीने मुला-मुलींसाठी स्वतंत्र दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.

दहीहंडी उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी सुंदर अभंगांचे गायन करून वातावरण भक्तिमय केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्साहात दहीहंडीचे थर रचले. प्रत्येक वर्गाने दहीहंडीला सलामी देत ढोल-ताशांच्या गजरात दहीहंडी फोडून उत्सवाचा आनंद द्विगुणित केला.

विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाष देवकाते सर आणि मुख्याध्यापिका सौ. शोभा देवकाते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते यांनी विद्यार्थ्यांना दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

या उत्सवाला संस्थेचे सचिव डॉ. तुषार देवकाते, भोसरी येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल दुराफे, छत्रपती इंगवले सर, युवा फाउंडेशनचे सदस्य भोर सर तसेच खो-खोचे माजी राष्ट्रीय खेळाडू फुरखान मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती.

दहीहंडीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आकर्षक राधा-कृष्णाची वेशभूषा केली होती. त्यामुळे विद्यालय परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवृंदांच्या उत्स्फूर्त सहभागाने दहीहंडी उत्सव आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. उत्साह, भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या दहीहंडी उत्सवाची आनंदात सांगता झाली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!