spot_img
spot_img
spot_img

गणेश विसर्जन घाटाची पाहणी; नागरिकांच्या सुविधांसाठी तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

गणेशोत्सव हा नागरिकांच्या श्रद्धा आणि भावनेशी जोडलेला महत्त्वाचा उत्सव असल्याने गणपती विसर्जनाच्या वेळी नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर परिसरातील विसर्जन घाटाची पाहणी करण्यात आली.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बाप्पू) काटे, नगरसेविका अनिताताई संदीप काटे आणि नगरसेविका कुंदाताई संजय भिसे यांच्या उपस्थितीत ड प्रभाग व ग प्रभागातील स्थापत्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत घाट परिसरातील विविध सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

विसर्जन घाटाची उंची वाढविणे, घाट परिसरातील किरकोळ तसेच आवश्यक कामे तातडीने पूर्ण करणे, तसेच पावसामुळे परिसरात साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक घाटावर येत असल्याने सुरक्षितता, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

नागरिकांच्या श्रद्धेचा आणि गणेशोत्सवाच्या आनंदाचा विचार करून आवश्यक असलेली सर्व कामे वेळेत आणि प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. गणेश विसर्जनाची प्रक्रिया सुरक्षित, सुव्यवस्थित आणि नागरिकांसाठी त्रासमुक्त व्हावी, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!