spot_img
spot_img
spot_img

चिंचवडच्या प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँण्ड ज्युनिअर कॉलेज मध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चिंचवड येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँण्ड ज्यूनिअर कॉलेज ( सी.बी.एस.ई. ) येथे शालेय विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा केला. नर्सरी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याचा यात समावेश होता . यावेळी चिमुकल्यांनी राधा-कृष्णाच्या वेशभूषेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

शाळेच्या प्रांगणाला फुले, मोरपिस आणि मटकीने सजवण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन आणि आरतीने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी भजन, गोपाळकाला, आणि श्रीकृष्णाच्या जीवनावरील नृत्यनाटिका सादर केल्या.

विद्यार्थ्यांसाठी खास दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चिमुकल्या गोविंदांनी एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून हंडी फोडण्याचा प्रयत्न केला, यावेळी संपूर्ण परिसर ‘गोविंदा आला रे आला’ च्या जयघोषाने दुमदुमून गेला. शिक्षकांनी श्रीकृष्णाच्या बाललीलांवर आधारित बोधकथा सांगून मुलांना सत्य, प्रेम आणि धर्माचे महत्व पटवून दिले.

यावेळी कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ . भूपाली शहा , संचालिका डॉ. तेजल शहा, शाळा व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वृंन्दा जोशी , उपमुख्याध्यापिका लिजा सोझु यांच्यासह सर्व विद्यार्थी ,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन प्राचार्या डॉ. वृंन्दा जोशी, उपप्राचार्या लिजा सोझु समवेत शिक्षकांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुखांनी केले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!