पिंपरी | प्रतिनिधी : युनूस खतीब
ई-सेवा केंद्र व शिष्यवृत्तीचे पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत दोन तरुणींना विश्वासात घेऊन त्यांच्या बँक खात्यांचे पासबुक व एटीएम कार्ड ताब्यात घेतल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरीतील महेशनगर येथे उघडकीस आला आहे.
आरोपी ओम अविनाश गाडे (२३) व सौरभ दत्तात्रय पाटणे (२३) यांनी संबंधित बँक खाती सायबर फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी वापरल्याचा आरोप आहे. या प्रकरणी १८ वर्षीय विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.










Total Users : 219294