spot_img
spot_img
spot_img

दिल्लीच्या कॉलेजमध्ये प्रवेशाचे आमिष; १० लाखांना पालकाला गंडा!

काळेवाडी | प्रतिनिधी : युनूस खतीब

दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये मुलाला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत चार जणांनी पालकाकडून तब्बल १० लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार काळेवाडी परिसरात उघडकीस आला आहे.

आरोपींनी ३ लाख रुपये ऑनलाइन तर ७ लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. मात्र, मुलाला प्रवेश मिळवून न देता घेतलेली रक्कमही परत केली नाही. याप्रकरणी अमित जैन (वय ४५) यांच्या फिर्यादीवरून सिद्धार्थ, विव्हान, वेदिका व तन्मय या चार मोबाईलधारकांविरुद्ध काळेवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!