spot_img
spot_img
spot_img

पहाटे तीन वाजता तीन पत्तीचा डाव; दोघे पोलिसांच्या जाळ्यात, ८२ हजारांची रोकड जप्त

चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

चिंचवड-वाल्हेकरवाडी येथे पवना नदीपात्राजवळील गुरांच्या गोठ्यालगत चार्जिंगच्या बल्बच्या प्रकाशात पहाटे तीन वाजता तीन पत्तीचा जुगार सुरू असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला.

कारवाईत सोनू अर्जुन सिंग (३०) आणि भानुदास भरत सुरवसे (२४) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ८२ हजार १४० रुपयांची रोकड, पत्त्यांची पाने, मोबाईल व मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांचे चार साथीदार पसार झाले असून, याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!