spot_img
spot_img
spot_img

पिंपरीत २.९३ किलो गांजा जप्त; १.५० लाखांचा मुद्देमाल, एकाला अटक

पिंपरी | प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपरीतील विठ्ठलनगर परिसरात विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या गांजा बाळगणाऱ्या आरोपीला संत तुकारामनगर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली.

साईलिला हौसिंग सोसायटीच्या मागील मोकळ्या जागेत पिंपळाच्या झाडाजवळ संशयित राहुल ऊर्फ अशोक गौतम जगताप (वय ३९) याच्याकडून २.९३२ किलो गांजा, अंदाजे किंमत १ लाख ५० हजार रुपये जप्त करण्यात आला. याप्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!