spot_img
spot_img
spot_img

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या; पती फरार

बावधन | प्रतिनिधी : युनूस खतीब

बावधन परिसरातील तोडकर वस्ती येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या गळ्यावर धारदार वस्तूने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २ सप्टेंबरच्या रात्री साडेनऊ ते ३ सप्टेंबरच्या पहाटे पाचच्या दरम्यान घडली.

परशुराम भागप्पा हरिजन (वय ४८, रा. इंचनाळ, विजापूर, कर्नाटक) याने पत्नी निलाबाई हिच्यासोबत चारित्र्याच्या संशयावरून वाद घातला. त्यानंतर तिच्या गळ्यावर धारदार वस्तूने वार करून तिची हत्या केली आणि घटनास्थळावरून पसार झाला.

याप्रकरणी मुलगा सुरेश परशुराम हरिजन (वय २४) याने बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपी पतीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!