spot_img
spot_img
spot_img

शहरात दिव्यांग महिलेवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी कठोर कारवाई करा

राष्ट्रवादी कोंग्रेसच्या महिला नगरसेविकांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आग्रही मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 पिंपरी-चिंचवड शहरात एका सराईत गुन्हेगाराने एका दिव्यांग महिलेवर केलेल्या अत्यंत अमानुष, पाशवी आणि मानवीतेला कलंक लावणार्‍या अत्याचाराची घटना अत्यंत संतापजनक आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी कोंग्रेसच्या महिला नगरसेविकांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राच्या माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या प्रकरणाची सखोल व कठोर दखल घेत, दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश माननीय उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर यांना दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातून हद्दपार असलेला सराईत गुन्हेगार किशोर पवार याने एका दिव्यांग महिलेला बेदम मारहाण केली, तिचे केस कापून तिला विद्रूप केले आणि तिला नग्न करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. एवढेच नव्हे तर या नृशंस कृत्याचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल देखील केले. या गंभीर प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असली, तरी पीडितेच्या सहमतीशिवाय व जबरदस्तीने झालेल्या या अमानुष कृत्याबाबत भादंवि कलम ३७६ (बलात्कार) सह आयटी ॲक्ट अंतर्गत कठोर गुन्हे दाखल करणे कायद्याने अत्यंत आवश्यक आहे, अशी आग्रही मागणी या शिष्टमंडळाने केली.

मुख्य आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने भविष्यात अशा प्रवृत्तींवर कठोर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी अधिक कठोर कलमांखाली कारवाई करावी, अशी विनंती करण्यात आली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत माननीय उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित पोलिस प्रशासनाला या प्रकरणाची कसून चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

राष्ट्रवादी कोंग्रेसच्या शिष्टमंडळात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे, नगरसेविका अश्विनी वाबळे, माजी नगरसेविका आशा शेंडगे, नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेविका माया बारने, नगरसेविका निकिता कदम, नगरसेविका भिमाताई फुगे, नगरसेविका प्रियंका कुदळे, नगरसेविका दिप्ती कांबळे आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रीतम शिंदे यांच्यासह इतर महिला कार्यकर्त्यांचा समावेश होता.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!