शबनम न्यूज | प्रतिनिधी
पूर्वा रेसिडेन्सीसमोर, शिवसाई लेन परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑईल सांडल्याने वाहन घसरून तब्बल चार अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
रस्त्यावर ऑईल सांडल्याची माहिती मिळताच भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बाप्पू) काटे, नगरसेविका अनिताताई संदीप काटे आणि नगरसेविका कुंदाताई संजय भिसे यांच्या वतीने श्री. संदीप काटे यांनी तातडीने घटनास्थळी दखल घेतली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि रस्त्यावर सांडलेले ऑईल हटविण्याची कार्यवाही केली. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचे घसरणे थांबले आणि पुढील अपघाताचा संभाव्य धोका टळला.

दरम्यान, या अपघातांपैकी एका अपघातात एक महिला जखमी झाली. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना Challenger Public School येथे बसविण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना तातडीने घटनास्थळी येऊन महिलेला घेऊन जाण्यास सांगण्यात आले.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनीही जखमी महिलेची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच रस्त्यावरील ऑईल हटविण्याची करण्यात आलेली कार्यवाही आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची माहिती दिली.
स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.




Total Users : 238938