पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
भुकुम येथील तरुणाच्या बँक खात्यांचा ऑनलाइन अॅक्सेस मिळवून त्याच्या संमतीशिवाय १ लाख ३ हजार ५८२ रुपये परस्पर वर्ग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बावधन पोलिसांनी राजस्थानातील दोघांना अटक केली आहे.
किशोर सूर्यवंशी यांच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक खात्यातून ९३ हजार रुपये, तर एचडीएफसी खात्यातून १० हजार ५८२ रुपये अन्य खात्यांवर वर्ग झाल्याचे निदर्शनास आले. खात्यांचा ऑनलाइन अॅक्सेस घेऊन ही रक्कम परस्पर काढण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी अशोककुमार निंबाराम जाखड (२५) आणि अर्जुन हिरामन अहलावत (२१) यांना अटक करण्यात आली असून, अमर वाघमारे व मनिषकुमार यांचाही तपास सुरू आहे.










Total Users : 218948