पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
ट्रेडिंगमधून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तरुणाची तब्बल ४२ लाख ४३ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार वाकडमध्ये समोर आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने ‘ट्रेड एक्स’ ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या नावाने फिर्यादी सुनील दवंगे यांना फोन करून गुंतवणुकीस प्रवृत्त केले. ऑक्टोबर २०२५ पासून त्यांनी वेळोवेळी गुंतवणूक करत १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत ४२ लाख ४३ हजार रुपये गुंतवले.
मात्र, रक्कम परत मिळविण्याचा प्रयत्न केल्यानंतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर व्यवहार दाखवून गुंतवणूक शून्य करण्यात आली. त्यानंतर संबंधित प्लॅटफॉर्मची सेबीच्या संकेतस्थळावर पडताळणी केली असता कंपनी नोंदणीकृत नसल्याचे आढळून आले. याप्रकरणी वाकड पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.










Total Users : 218662