spot_img
spot_img
spot_img

ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू?

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपळे गुरव येथील सुश्रुत सर्जिकल हॉस्पिटलमध्ये उपचार व ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत दोन डॉक्टरांविरुद्ध सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बबन शिवराम कातखडे यांच्यावर उपचार सुरू असताना डॉक्टरांकडून हयगय व निष्काळजीपणा झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नी निर्मला कातखडे यांनी केली. या प्रकरणाची वैद्यकीय कागदपत्रांसह ससून रुग्णालयातील तज्ज्ञ समितीकडून चौकशी करण्यात आली. समितीच्या अभिप्रायात उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून प्रथमदर्शनी निष्काळजीपणा झाल्याचे नमूद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी डॉ. मधू काशीराव पठाणु आणि भूलतज्ज्ञ डॉ. अभिषेक विद्याधर लोणीकर यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४ (अ), ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपी अद्याप अटकेत नाहीत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!