पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
थेरगाव येथे आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका व्यक्तीला हाताने मारहाण करून हातातील कड्याने डोक्यात वार करत गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
रामराजे शेंडगे यांच्याकडे आरोपी किशोर जगताप याचे पैसे बाकी असल्याच्या कारणावरून वाद झाला. यावेळी आरोपीने शेंडगे यांना मारहाण करत हातातील कड्याने त्यांच्या डोक्यात वार केला. यात शेंडगे गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी किशोर बलभीम जगताप (वय अंदाजे ४०) याच्याविरुद्ध काळेवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.




Total Users : 226261