पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
किवळे येथे जुन्या वादातून तरुणाला फोन करून खाली बोलावून हॉकी स्टिकने पाठीवर व मानेवर मारहाण करत कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी तरुणाच्या आई-वडिलांनाही धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
पियुष चव्हाण यांना आरोपीने फोन करून के टाऊन इमारतीखाली बोलावले. तेथे आरोपी इशान डे हा तीन साथीदारांसह आला आणि कोणतीही चर्चा न करता हॉकी स्टिकने मारहाण केली. त्यानंतर चारचाकी वाहनातून लोखंडी कोयता काढून हल्ला करण्यासाठी धावून आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घटना पाहून कुटुंबीय व स्थानिकांनी मध्यस्थी केली असता आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की केली. याप्रकरणी इशान विक्रम डे (२६), सिद्धांत लटांबळे (२७), शुभम प्रेमल (२९) आणि राहुल चौहान (२८) यांना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.




Total Users : 226227