spot_img
spot_img
spot_img

CRIME : झेप्टो स्टोअरमध्ये तरुणावर स्टील रॉडने हल्ला

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपळे निलख येथील विनायकनगर परिसरातील झेप्टो स्टोअरमध्ये वेटिंग एरियात थांबलेल्या २३ वर्षीय तरुणावर स्टील रॉडने हल्ला केल्याची घटना घडली.

यश दुबे हे स्टोअरच्या वेटिंग एरियात थांबले असताना अतुल सोनवणे व योगेश चव्हाण यांनी कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करत त्यांना हाताने मारहाण केली. यावेळी तरुणाने मारहाणीचे कारण विचारले असता योगेश चव्हाण याने स्टीलच्या रॉडने मारहाण करून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी अतुल सोनवणे व योगेश चव्हाण यांच्याविरुद्ध सांगवी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११५ (२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी अद्याप अटकेत नसून, पोलिस तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!