spot_img
spot_img
spot_img

भरधाव अज्ञात वाहनाची पादचाऱ्याला धडक; ३८ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

कुरुळीफाटा ते चिंबळीफाटा रस्त्यावर भरधाव अज्ञात वाहनाने पादचाऱ्याला धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.

सुधाकर मोहन राठोड (वय ३८) हे कांबळेवस्ती परिसरातील पानटपरीकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला व डोळ्याला गंभीर दुखापत, तर दोन्ही हातांना किरकोळ दुखापत झाली आहे.

वाहनचालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून वाहन व चालकाचा शोध सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!