पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीत कौटुंबिक वादातून ६८ वर्षीय महिलेचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी सूनसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. फिर्यादी अनिता मेहतानी या घरातील नोकराणीच्या बेडरूममध्ये गेल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. आरोपींनी धक्काबुक्की व मारहाण केली. यावेळी एकाने छाती दाबून अपमानास्पद वक्तव्य केल्याचे, तर सून प्रेरणा नारायण हिने गळा दाबून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच ‘तुला जिवंत सोडणार नाही, तुझा मर्डर करणार’ अशी धमकी दिल्याचेही पोलिसांनी सांगितले.
या घटनेत फिर्यादीचे पती व मुलगा वैभव यांनाही मारहाण व शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.










Total Users : 218626