पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
आळंदी येथील इंद्रायणी नदीपात्रालगत १ ते २ महिन्यांच्या स्त्री जातीच्या अर्भकाचा मृतदेह कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
पीसीएमटी बसथांब्याजवळील स्मशानभूमीलगत नदीपात्राच्या बाजूला अर्भकाचा मृतदेह आढळला. अज्ञात आई-वडील अथवा पालकांनी जन्म किंवा मृत्यूची बाब लपविण्याच्या उद्देशाने अर्भकाच्या मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात अज्ञात पालकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अर्भकाची ओळख व मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.




Total Users : 226261