पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
रावेत येथे पहाटेच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करत १६ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थासह दोघांना अटक केली. या कारवाईत एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नर्मदा पार्क कॉर्नर, स्वप्नपूर्ती सोसायटीजवळ संशयितरित्या आढळलेल्या कालीदास कांबळे (२४) आणि करण नलावडे (१८) यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे ४८ हजार रुपये किमतीचे १६ ग्रॅम एमडी आढळून आले. तसेच ५५ हजार रुपये किमतीची मोपेड असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.




Total Users : 226270