प्रतिनिधी | युनूस खतीब
गणेशोत्सवातील डीजे आणि कर्णकर्कश लाऊडस्पीकरच्या वाढत्या आवाजाविरोधात जनजागृती करणारे सजग नागरिक विद्यानंद बापट यांना टिळक रस्त्यावरील परिसरात अज्ञात व्यक्तीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली.
बापट हे गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाविरोधात नागरिकांमध्ये जनजागृती करत असून, याच अनुषंगाने ते डीजेविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवत होते. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. विशेष म्हणजे, हा प्रकार कॅमेऱ्यासमोरच घडल्याने संपूर्ण घटना व्हिडिओमध्ये कैद झाली आहे.
डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना होणाऱ्या त्रासाविरोधात बापट सातत्याने भूमिका मांडत आहेत. त्यामुळे जनजागृती मोहीम सुरू असतानाच झालेल्या या मारहाणीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, मारहाणीच्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, संबंधित अज्ञात व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.




Total Users : 226259