spot_img
spot_img
spot_img

भाजपा ओबीसी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी विजय उर्फ शीतल शिंदे यांची निवड

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाच्या सरचिटणीसपदी विजय उर्फ शीतल शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाने सोपविलेल्या या नव्या जबाबदारीबद्दल शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, पक्षाने दाखविलेला विश्वास हा आपल्यासाठी प्रेरणादायी असून या विश्वासाला आपल्या कार्यातून उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त केला.

नव्या जबाबदारीची सुरुवात करताना शिंदे यांनी भक्ती-शक्तीच्या पवित्र भूमीत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ जगताप, विधान परिषद आमदार अमित गोरखे तसेच भाजपा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी या नेत्यांना भक्ती-शक्तीची प्रतिमा भेट देत त्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले.

पक्ष संघटना मजबूत करण्यासोबतच ओबीसी समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करण्याचा संकल्प शिंदे यांनी व्यक्त केला. सामाजिक न्याय, जनहित आणि संघटनवाढीच्या माध्यमातून ओबीसी समाजातील विविध घटकांपर्यंत पक्षाची भूमिका व शासनाच्या योजनांचा प्रभावीपणे पोहोच करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी प्रेरणादायी ताकद आहे. ही जबाबदारी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि पूर्ण समर्पणाने पार पाडत ओबीसी समाजाच्या सक्षमीकरणासाठी, संघटनवाढीसाठी आणि जनहिताच्या कार्यासाठी अधिक जोमाने काम करणार आहे,” असा निर्धार विजय उर्फ शीतल शिंदे यांनी व्यक्त केला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!