spot_img
spot_img
spot_img

गोकुळाष्टमीनिमित्त आकुर्डीत अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

युवा नेते विशाल बाळासाहेब काळभोर यांची उपस्थिती; ग्रंथ आरतीचा बहुमान

शबनम न्यूज | प्रतिनिधी

गोकुळाष्टमीनिमित्त आकुर्डी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भक्तिमय वातावरणात अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक प्रमोद कुटे व परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक सोहळ्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या भक्तिमय सोहळ्यास युवा नेते विशाल बाळासाहेब काळभोर यांनी निमंत्रित म्हणून उपस्थित राहून ज्ञानेश्वरी पारायण, हरिनाम सप्ताह आणि ग्रंथ आरतीचा आध्यात्मिक अनुभव घेतला. यावेळी त्यांना ग्रंथ आरतीचा बहुमान प्राप्त झाला.

यावेळी माजी नगरसेवक निलेश पांढरकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश लंगोटे, विनायक काळभोर यांच्यासह विविध मान्यवर आणि भाविक उपस्थित होते.

सोहळ्यादरम्यान पंढरपूर येथील भरत महाराज अलिबागकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी युवा नेते विशाल बाळासाहेब काळभोर यांनी महाराजांचे आशीर्वाद घेतले. संतवाङ्मय, हरिनाम आणि भक्तिरसाने भारलेल्या या वातावरणातील संत-महंतांचा सहवास आणि आशीर्वाद लाभल्याने मन प्रसन्न झाले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मंदिर परिसरात हरिनामाचा गजर, ज्ञानेश्वरी पारायण आणि धार्मिक वातावरणामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेतला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!