शबनम न्यूज | प्रतिनिधी
रहाटणी परिसरातील त्रीशक्ती कॉलनी येथे ड्रेनेज चोकअप झाल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता तसेच ये-जा करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. नागरिकांची समस्या लक्षात घेऊन नगरसेवक सागर कोकणे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
यावेळी नगरसेवक सागर कोकणे यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून ड्रेनेज व्यवस्थेची पाहणी केली. नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन ड्रेनेजची आवश्यक ती दुरुस्ती तात्काळ करून सांडपाण्याचा निचरा सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या समस्या प्रलंबित न ठेवता त्यांचे तातडीने निराकरण करण्याला आपले प्राधान्य असल्याचे नगरसेवक सागर कोकणे यांनी यावेळी सांगितले.
या पाहणीप्रसंगी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका अर्चनाताई तापकीर, नगरसेविका सविताताई खुळे, उपअभियंता संजय बंडगर तसेच कनिष्ठ अभियंता अमित पवार उपस्थित होते.
नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यवाही सुरू केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.










Total Users : 217858