spot_img
spot_img
spot_img

आरपीआयच्या वकील आघाडीच्या पुणे शहर अध्यक्षपदी ॲड,देबोज्योती तालुकादार यांची नियुक्ती

पुणे प्रतिनिधी शंकर जोग

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शहर वकील आघाडीच्या अध्यक्षपदी ॲड, देबोज्योती तालुकादार यांची नियुक्ती करण्यात आली हे नियुक्तीपत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव आणि पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी प्रदेश सदस्य ॲड, मंदार जोशी,आरपीआय ख्रिश्चन आघाडी पुणे शहराध्यक्ष क्रिस्तोफर राजमणी, पुणे शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, पुणे शहर उपाध्यक्ष येशू दोरस्वामी, ख्रिश्चन आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष अरुण पवार, सेक्रेटरी स्टॅनले नेथल आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीआयच्या वकील आघाडीचे पुणे शहरात संघटन मजबूत करण्यासाठी आणि समाजातील वंचित घटकांना कायदेशीर न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे असे मत ॲड, देबोज्योती तालुकादार यांनी सांगितले

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!