spot_img
spot_img
spot_img

एमआयटी-एडीटीचा तेजस पाटील भारतीय आशियाई तलवारबाजी संघात!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

जपानमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय तलवारबाजी (फेन्सिंग) संघाची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये पुण्याच्या एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान (एमआयटी-एडीटी) विद्यापीठाचा विद्यार्थी तेजस मनोज पाटील याने भारतीय पुरुषांच्या ‘फॉइल’ संघात आपले स्थान पक्के केले आहे.
भारतीय तलवारबाजी संघटनेच्या (फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडिया) निवड समितीने नुकतीच या पथकाची अधिकृत घोषणा केली. राष्ट्रीय मानांकन तसेच आशियाई वरिष्ठ तलवारबाजी चॅम्पियनशिप, जागतिक चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल तलवारबाजी चॅम्पियनशिपमधील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे खेळाडूंची अंतिम निवड करण्यात आली आहे.
निवड झालेले सर्व खेळाडू पटियाला येथे १५ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या राष्ट्रीय तयारी शिबिरामध्ये सहभागी होतील. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी स्पर्धापूर्व वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी संपूर्ण भारतीय संघ थेट जपानमधील आयची-नागोया येथे रवाना होणार आहे.
एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ कॉम्प्युटिंगचा (एसओसी) विद्यार्थी असलेल्या तेजस पाटील याने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरी, मेहनत आणि उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर यापूर्वी चीनमधील शांघाय येथे झालेल्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ आणि नायजेरियातील लागोस येथे झालेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या ‘फॉइल’ संघात स्थान मिळवले होते. या स्पर्धांमध्ये त्याने दोन रौप्य व एक कांस्य पदक पटकावले होते. आता पुन्हा एकदा आशियाई फेन्सिंग स्पर्धेत पुरुषांच्या ‘फॉइल’ प्रकारात तो भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याने विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
तेजसच्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील निवडीबद्दल एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक डॉ. सुनिता कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस. आणि क्रीडा विभाग संचालक प्रा. पद्माकर फड यांच्यासह विद्यापीठातील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!