पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी युनूस खतीब
सावरदरी येथील कंपनीच्या पार्किंगमध्ये उभी केलेली ७२ हजार रुपये किमतीची बजाज प्लॅटिना दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भूषण रामनाथ वर्षे यांनी २८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास सावरदरी येथील बावर इक्युमेंट इंडिया कंपनीच्या पार्किंगमध्ये त्यांची बजाज प्लॅटिना मोटारसायकल (क्र. एमएच १७ सीएस २१६५) पार्क केली होती.
दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पार्किंगमध्ये परतल्यानंतर दुचाकी जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने दुचाकी चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी ३१ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलिस हवालदार चाफळे करीत आहेत.










Total Users : 217865