spot_img
spot_img
spot_img

घराचे कुलूप तोडून सव्वा लाखांचे दागिने, टीव्ही लंपास; चोऱ्होली खुर्दमध्ये चोरटा जेरबंद

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी युनूस खतीब

चोऱ्होली खुर्द येथील पद्मदर्शन पार्क परिसरात घराचे लोखंडी ग्रिलचे कुलूप व आतील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून सोन्याचे दागिने आणि एलईडी टीव्ही असा सुमारे १ लाख ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत रणजित अशोक भिसे (वय ३१) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मावती रोडवरील पद्मदर्शन पार्क फेज-१, गल्ली क्रमांक तीन येथे फिर्यादी संग्राम देवकर यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले. २८ ऑगस्ट रोजी पहाटे साडेचारपासून ३१ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या बाहेरील लोखंडी ग्रिलचे कुलूप तोडले. त्यानंतर आतील दरवाजाचा कडी-कोयंडाही तोडून घरात प्रवेश केला.

घरातील सोन्याचे दागिने तसेच हायर कंपनीचा एलईडी टीव्ही असा एकूण १,९०,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी रणजित भिसे याला निष्पन्न आरोपी म्हणून अटक केली. चोरीच्या या गुन्ह्याचा पुढील तपास आळंदी पोलिस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!