spot_img
spot_img
spot_img

पुनावळेत ‘आधीरा स्पोर्ट्स अकॅडमी’चा शुभारंभ

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील पुनावळे परिसरातील नामांकित आधीरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने *‘आधीरा स्पोर्ट्स अकॅडमी’*ची सुरुवात करण्यात आली. स्कूलचे चेअरमन नवनाथ ढवळे यांच्या पुढाकारातून या क्रीडा अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना केवळ शालेय शिक्षणापुरते मर्यादित न ठेवता त्यांना क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षण, संधी आणि योग्य मार्गदर्शन मिळावे, तसेच विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून शाळेसह पिंपरी-चिंचवड शहराचे नाव उज्ज्वल करावे, या उद्देशाने आधीरा स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करण्यात आली आहे.

या अकॅडमीचे उद्घाटन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ जगताप आणि ॲड. अशोक पलांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत क्रीडा क्षेत्रातील या नव्या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाला जेएसपीएमचे संचालक रवींद्र सावंत, उद्योजक वसंत काटे, युवा नेते काळूराम बारणे, सचिन मांदळे, युवा नेते रामदास कस्पटे, किशोर चित्राव, सुनील ढवळे, भरत काटे, राजाराम काटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आधीरा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नियमित सराव, क्रीडा प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक वातावरण मिळणार असल्याने भविष्यात या अकॅडमीतून गुणवंत खेळाडू घडतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

‘शिक्षणासोबत क्रीडा, कौशल्यासोबत आत्मविश्वास आणि गुणवत्तेसोबत संधी’ या उद्देशाने सुरू झालेली आधीरा स्पोर्ट्स अकॅडमी विद्यार्थ्यांच्या क्रीडा कारकिर्दीसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!