spot_img
spot_img
spot_img

गुरुवर्य अकॅडमी स्कूल, चिखली येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

चिखली : गुरुवर्य अकॅडमी स्कूल, चिखली येथे रक्षाबंधनाचा विशेष कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. प्रेम, विश्वास, आपुलकी आणि संरक्षणाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

पोलीस हवालदार स्वप्नील पाचपांडे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील हांडे, राम निचाड, शिंदे मॅडम, हिरा तळपे मॅडम, हेड कॉन्स्टेबल संतोष मुंडे, देशमुख मॅडम यांची उपस्थिती लाभली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत सर आणि पीएसआय दीपमाला लोहकरे मॅडम यांच्याबरोबर विद्यार्थ्यांनी चिखली येथील पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन साजरा केला.

शाळेचे संस्थापक श्री भूषण मावळे सर, मुख्याध्यापिका सौ. ज्योत्स्ना मॅडम, समन्वयक सौ. प्रतिभा मॅडम आणि मोहना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशाली अरगडे मॅडम यांनी केले.
रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने सुंदर राख्या तयार केल्या. या राख्या मान्यवर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बांधून विद्यार्थ्यांनी त्यांच्या समाजसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना सुरक्षितता, शिस्त आणि वाहतूक नियमांचे पालन याबाबत मार्गदर्शन केले.

देशमुख मॅडम यांनी जबाबदारीची भावना, शिस्त, संवेदना, संयम, संघ भावना यावरील उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रक्षाबंधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, कृतज्ञता, सामाजिक बांधिलकी आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्याचा सुंदर संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका, समन्वयक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम आनंददायी आणि संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!