spot_img
spot_img
spot_img

लांडेवाडीत भरदिवसा पत्त्यांचा जुगार; पाच जणांवर कारवाई, २.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

भोसरी : सार्वजनिक ठिकाणी पैसे लावून पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत २ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त करण्यात आली.

ही कारवाई २७ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास लांडेवाडी, भोसरी येथे भोसरी-निगडी रोडलगत इलेक्ट्रिक सदनसमोरील गार्डनजवळील मोकळ्या जागेत करण्यात आली.

याबाबत पोलिस शिपाई नितीन आप्पा खेसे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय नारायण खुडे (वय ४८), राजू हनुमंत राठोड (वय ३६), महमद हुसेन नदाफ (वय ३५), सुभाष अंगद लोंढे (वय ४६) आणि उमेश शंकर चव्हाण (वय ३८) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सार्वजनिक ठिकाणी एकत्र आले होते. रोख रक्कम लावून पत्त्यांचा जुगार खेळत असताना पोलिसांनी त्यांच्यावर छापा टाकला. या कारवाईत जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण २ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!