spot_img
spot_img
spot_img

भाटनगरमध्ये गांजासह एकाला अटक; १ किलो ७६४ ग्रॅम गांजा जप्त

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपरी : भाटनगर परिसरात गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका व्यक्तीला पिंपरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १ किलो ७६४ ग्रॅम गांजा आणि मोपेड असा एकूण २ लाख २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास भाटनगर येथील बिल्डिंग क्रमांक ५, घर क्रमांक १२ समोर करण्यात आली.

याबाबत पोलिस शिपाई रोहित रघुनाथ वाघमारे (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश ताराचंद मलकेकर (वय ३६, रा. भाटनगर, पिंपरी) याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(ii)(ब), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा नंबर प्लेट नसलेल्या पांढऱ्या रंगाच्या टीव्हीएस ज्युपिटर मोपेडवर बसलेला असताना पोलिसांना आढळला. त्याची झडती घेतली असता पांढऱ्या पिशवीत १ किलो ७६४ ग्रॅम निव्वळ वजनाचा गांजा आढळून आला. या गांजाची किंमत ८८ हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

याशिवाय १ लाख १२ हजार रुपये किमतीची टीव्हीएस ज्युपिटर मोपेड असा एकूण २ लाख २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पिंपरी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!