spot_img
spot_img
spot_img

जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार; चिखलीत दोघांसह तिघांवर गुन्हा

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

चिखली : वर्षभरापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका १७ वर्षीय मुलाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्याला जखमी केल्याची घटना चिखलीतील जाधववाडी परिसरात घडली. याप्रकरणी दोन १८ वर्षीय तरुणांसह त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत खुर्शद समिउल्ला शेख (वय १७, रा. जाधववाडी, चिखली) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर खान (वय १८), अमन खान (वय १८) आणि आतिश (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अटकेत नाहीत.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी हा मित्रासोबत चहा पिऊन दुचाकीवरून घरी जात होता. शालीमार हॉटेलसमोर, सिल्वर जिम रोड परिसरात आरोपी पॅशन प्रो दुचाकीवरून तेथे आले. वर्षभरापूर्वी झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी समीर याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले.

यावेळी फिर्यादीच्या मित्राच्या पायावरही रॉडने मारहाण करण्यात आली. तसेच अमन आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेप्रकरणी २७ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चिखली पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!