spot_img
spot_img
spot_img

‘कोटेक्स बायनरी ट्रेडिंग’मध्ये तिप्पट-चौपट नफ्याचे आमिष; चिंचवडमधील तरुणाची १३.२० लाखांची फसवणूक

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

चिंचवड : ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये हमखास तिप्पट-चौपट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत चिंचवडमधील एका तरुणाची १३ लाख २० हजार ३६२ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रमोद हिंमतराम पुरोहित (वय ३३, रा. प्रेमसागर सोसायटी, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तपसकुमार मोहान्टो याच्यासह टेलिग्राम, इंस्टाग्राम व विविध वेबसाइट लिंकच्या माध्यमातून संपर्क करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या मोबाइल क्रमांकावर टेलिग्रामद्वारे संदेश व लिंक पाठवून ‘Quotex Binary Trading’ मध्ये पैसे गुंतवल्यास खात्रीशीर तीन ते चार पट नफा मिळेल, असे सांगितले. या आमिषाला बळी पडून फिर्यादीने आरोपींनी सांगितलेल्या विविध Binance ID वर पैसे पाठवून गुंतवणूक केली.

मात्र गुंतवणुकीनंतर आरोपींनी ना गुंतवलेली मूळ रक्कम परत केली, ना त्यावरील नफा दिला. अशा प्रकारे आरोपींनी संगनमत करून १३ लाख २० हजार ३६२ रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(डी), ६६(सी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, चिंचवड पोलिसांकडून ऑनलाइन व्यवहार, मोबाइल क्रमांक, सोशल मीडिया खाती आणि संबंधित लिंकची चौकशी सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!