spot_img
spot_img
spot_img

थेरगावात धारदार कोयत्यासह तरुण आढळला; काळेवाडी पोलिसांची कारवाई

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

थेरगावातील काळेवाडी स्मशानभूमीजवळ धारदार लोखंडी कोयता घेऊन फिरणाऱ्या १८ वर्षीय तरुणावर काळेवाडी पोलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडून एक हजार रुपये किमतीचा लोखंडी कोयता जप्त करण्यात आला.

ही घटना २६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे १२.०३ वाजता काळेवाडी स्मशानभूमीजवळ घडली. गुन्हे शाखा युनिट-२ मधील पोलिसांना दत्ता प्रभाकर वाघमारे (वय १८, रा. शिवकृपा, नढेनगर, काळेवाडी) हा संशयास्पदरीत्या आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे धारदार लोखंडी कोयता मिळून आला.

सदर तरुण हा गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४(२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीस बीएनएसएस कलम ३५(३) नुसार नोटीस देण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेटे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!